अमरावती - काँग्रेसची दुष्काळ पाहणी समिती आज चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेशवर दुष्काळग्रस्त गावात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यापुढे आपल्या वेदना मांडल्या. तर, दुष्काळामुळे जळून गेलेल्या संत्र्यांच्या बागांमुळे आता आमच्यावर कोरड्या विहिरीत उडी मारून जीव देण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी समितीसमोर मांडल्या आहेत.
..कोरड्या विहिरीत जीव देण्याची वेळ आलीय; काँग्रेस समितीसमोर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया - संत्रा
परिसरातील सर्व संत्रा झाडी जुळून नष्ट झाली आहे आणि आम्हाला शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाची झाडे सुकली तेंव्हा शासनाने तिथे २ लाख रुपये नुकसान भरपाई दिली, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी समितीसमोर मांडल्या आहेत.
परिसरातील सर्व संत्रा झाडी जुळून नष्ट झाली आहे आणि आम्हाला शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाची झाडे सुकली तेंव्हा शासनाने तिथे २ लाख रुपये नुकसान भरपाई दिली. इकडे आमच्याकडे मात्र शासनाचे लक्ष नाही. पीक विम्याचे पैसे सुद्धा आम्हाला मिळाले नाहीत. संत्रा बागांची अवस्था पाहून उत्पादकांना कोरड्या विहिरीत जीव द्यावा की काय, असे विचार येतात, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
माजी मंत्री काँग्रेसचे नेते वसंत पुरके, आमदार राहुल बोंद्रे, आमदार वीरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडणे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांनी आमला विश्वेशवर गावाला भेट दिली. काँग्रेसच्या समितीने आमला विश्वेशवर परिसरातील संत्रा बागांची पाहणी केली. या भागातील परिस्थिती आम्ही सरकारसमोर मांडू आणि सरकार नेमके काय करत आहे, असा जाबही सरकारला विचारू, असे काँग्रेसच्या समितीने शेतकऱ्यांना आश्वासन दिले.