अमरावती - कोरोनामुळे अमरावतीकरांच्या नाकीनऊ आले असताना आता अमरावतीत सारी या आजाराची 22 जणांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. सारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
कोरोना बरोबरच 'सारी'चा कहर.. अमरावतीत 22 जणांमध्ये लक्षणं
कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी आता प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
amravati
अमरावतीमध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आले असून यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 4 हजार 710 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना विरुद्ध लढा उभारण्यास प्रशासनासह अमरावतीकर चांगला प्रयत्न करत असताना सारी या आजाराचे एकूण 22 जणांमध्ये लक्षणे आढळून आल्याची धक्कादायक माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.
कोरोना विरुद्ध लढाई जिंकण्यासाठी आता प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.