अकोला - बाळापूर तालुक्यातील कवठा येथे व्हीव्हीपॅटमधून कागद निघत नसल्याच्या कारणावरून मतदाराने मशीन फोडल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मतदार श्रीकृष्ण घ्यारे याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
व्हीव्हीपॅटमधून कागद येत नाही म्हणून फोडली मशिन, कवठा मतदान केंद्रावरील प्रकार - बाळापूर
कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने रागाच्या भरात मशीन फोडली.
पुरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कवठा येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना श्रीकृष्ण घ्यारे हा मतदार मतदान करण्यासाठी गेला. मतदानाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याने व्हीव्हीपॅटमधून कागद येत नसल्याची तक्रार केली. कर्मचाऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने रागाच्या भरात मशीन फोडली.
मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मशीन बदलत मतदान प्रकियेला सुरुवात केली आहे. याप्रकारानंतर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित सुरू आहे.