अकोला- मलकापुरातील एका बंगल्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. एटीएसचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी ही कारवाई केली.
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी, ५ जण एटीएसच्या ताब्यात - क्रिकेट
सुधीर सावंत, शाम हेडा असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी कारवाईत मोबाइल, लॅपटॉप आणि एलईडी टीव्ही असा एकत्रित लाखो रुपयांचा मुद्देमाल केला.
ताब्यात घेतलेले ५ जण
शहरातील मलकापूर येथील सनसिटी परिसरातील एका बंगल्यात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती दहशतवादी पोलीस पथकाला (एटीएस) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी येथे छापा मारला. आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असताना ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. सुधीर सावंत, शाम हेडा असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी कारवाईत मोबाइल, लॅपटॉप आणि एलईडी टीव्ही असा एकत्रित लाखो रुपयांचा मुद्देमाल केला.