महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lok Sabha Election : कवठा केंद्रावर श्रीकृष्ण घ्यारे या तरुणाने फोडले इव्हीएम मशीन; पोलिसांचा तगडा बंदोबस्त - risode

कवठा केंद्रावर इ्हीएम मशीन फोडणाऱ्या तरुणाची ओळख पटली. श्रीकृष्ण रामदास घ्यारे असे मशीन फोडणाऱ्या तरुणाचे नाव. मालेगाव शहरात संदेश लाहोटी या नवरदेवाने नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्रावर येवून मतदानाचा हक्क बजाविला आहे.

अकोला मतदान

By

Published : Apr 18, 2019, 8:38 AM IST

Updated : Apr 18, 2019, 11:09 PM IST

अकोला- दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या अकोला लोकसभेसाठी जिल्ह्याच्या रिसोड विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. विधानसभा क्षेत्रातील रिसोड व मालेगांव तालुक्यामध्ये २२२ गावांमधील ३३४ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सहकुटुंब मतदान. तर, काही ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती.

Live updates On Voting :

कवठा केंद्रावर इ्हीएम मशीन फोडणाऱ्या तरुणाची ओळख पटली. श्रीकृष्ण रामदास घ्यारे असे मशीन फोडणाऱ्या तरुणाचे नाव.

३ :०० Pm - अकोला मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.३९ टक्के मतदान

१:०० pm -अकोला मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३२.०२ टक्के मतदान

११:०० am -अकोला मतदारसंघात ११ वाजेपर्यंत २१.०३ टक्के मतदान

११:३३ am -अकोल्यात कवठा आणि बाळापूर येथे ईव्हीएम मशिन फोडल्या. याप्रकरणी श्रीकृष्ण प्यारे ताब्यात. घटनेनंतर नवीन ईव्हिएम बसवून मतदानाला सुरुवात.

१०:३० am -गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पत्नी अपर्णा पाटील यांच्यासह महाराष्ट्र कन्या शाळेत बजावला मतदानाचा हक्क.

९:०० am -अकोला मतदारसंघात ७.५६ टक्के मतदान.

८:५० am - विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी सहकुटुंबासह केले मतदान.

८:१० am -विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या मूळ गाव पळसो बढे येथे वृद्ध व्यक्ती मतदार यादीत मृत म्हणून घोषित. तर, एकाच कुटुंबातील ३ मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस.

८:०० am -जिल्ह्यातील ३ ठिकाणी मतदान यंत्रात अडचणी.

७:५४ am -मालेगाव शहरात संदेश लाहोटी या नवरदेवाने नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकांनी आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकाराचा फायदा घेऊन आपण विकास करणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

७:00 - जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात लोकसभेच्या मतदानाला सुरुवात.

अकोला लोकसभेत मतदानासाठी २ सखी केंद्र राहणार आहेत. ३ लाख ४ हजार १२७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २ हजार १७० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

Last Updated : Apr 18, 2019, 11:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details