हैदराबाद : नोकरी गमावणे किंवा व्यवसायात अपयश आल्यास आर्थिक अडचणी अटळ असतात. त्यामुळे तुमचे नियमित उत्पन्न थांबते आणि हप्ते भरणे एक ओझे बनू शकते. तसेच त्यामुळे बँकांना तुमच्या कर्जाला बुडीत कर्ज किंवा एनपीए (NPA) म्हणून घोषित करावे लागते. गेल्या काही काळात मंदीमुळे शेकडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेकांना त्यांच्या कर्जाची चिंता वाटते आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डची बिले इत्यादी कुढलेही कर्ज नसलेला कोणताही व्यक्ती नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत, तेव्हा बँका कर्जदारावर काय कारवाई करतील हे जाणून घेतले पाहिजे.
एनपीए म्हणजे काय? : सलग तीन महिने हप्ते न भरल्यास बँका आणि वित्तीय संस्था कोणत्याही कर्जाला तात्पुरते बुडित कर्ज मानतात. याप्रकरणी बॅंका कर्जदाराला नोटिस पाठवतात. हप्ते भरण्यास उशीर झाल्यास बँका हप्त्याच्या रकमेच्या 1 ते 2 टक्के विलंब शुल्क आकारतात. ईएमआय 6 महिन्यांपर्यंत न भरल्यास, बँका त्यास नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) मानतात. कर्जाचे एनपीए मध्ये रुपांतर झाल्यावर परिस्थिती त्रासदायक होते. बँका आणि वित्तीय संस्था कायदेशीर कारवाई करण्याच्या शक्यतेचा विचार करतात. काही वित्तीय संस्था त्यांचे एनपीए तृतीय पक्षांना देखील सुपूर्द करतात.
क्रेडिट स्कोअर :जर हप्ते योग्यरित्या भरले नाहीत तर क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. ईएमआय नियमितपणे जमा न केल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर खाली घसरू शकतो. सध्या बँकांनी त्यांचे व्याजदर रेपोशी जोडले आहेत. याशिवाय, कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित व्याज निश्चित केले जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. जर बँकांनी तुमचे कर्ज एनपीए म्हणून दाखवले तर तुमची विश्वासार्हता आणखी खराब होईल.
हप्ते : तात्पुरत्या आर्थिक अडचणी आणि हप्ते भरण्यास असमर्थता असल्यास, मुदत ठेवी आणि विमा पॉलिसींवर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करावा. ही सर्व थकबाकी तुम्हाला पुन्हा आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर लगेचच निकाली काढावी. जर तुम्हाला खूप आर्थिक अनिश्चितता वाटत असेल तर प्रथम कमी व्याजाच्या गुंतवणूक योजनांमधून माघार घ्या. तात्पुरती सुरक्षा म्हणून कर्ज घेतले जाऊ शकते. तुम्ही काही वर्षे ईएमआय भरू शकत नसल्यास कर्ज विमा पॉलिसींसारख्या गोष्टी तुमचे संरक्षण करतील. ही पॉलिसी तात्पुरती नोकरी गमावल्यास किंवा उत्पन्न कमी झाल्यास मदत करते. किमान 6 महिन्यांच्या ईएमआयएवढी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून नेहमी उपलब्ध ठेवावी. यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक दबाव येणार नाही. कमी ईएमआयसह कर्जाचा कालावधी निवडणे आणि आपल्या आर्थिक साधनांमध्ये कर्ज घेणे केव्हाही सुरक्षित असते.
उत्पन्न आणि खर्च :हप्ते म्हणून परतफेड करण्यासाठी तुम्हाला परवडेल त्यापेक्षा जास्त कर्ज घेऊ नका. कर्जाच्या हप्त्यांवर तुमच्या उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नका. जर 30,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने ईएमआय मध्ये 40 टक्के रक्कम दिली, तर तो उरलेल्या 18,000 रुपयांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल का? एक लाख पगार असलेल्या व्यक्तीने 40,000 रुपये हप्ते भरले तरीही उर्वरित पैसे नियमित खर्चासाठी वापरू शकतात. म्हणून, उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन ठेवा. जर तुम्हाला कर्ज लवकर फेडायचे असेल तर तुमचे खर्च कमी करा. तुमचे मासिक बजेट तयार करा. त्यात खर्चाला प्राधान्य द्या. अनिवार्य बिले, फी आणि अनावश्यक खर्च स्वतंत्रपणे लिहा. प्रथम आवश्यक खर्चासाठी पैसे बाजूला ठेवा. अनावश्यक खर्च अजिबात करू नका. हे वाचवलेले पैसे कर्जाच्या परतफेडीसाठी वापरा.
कर्जाची पुनर्रचना :मोठी कर्जे असताना ईएमआय भरणे कठीण काम आहे. जेव्हा आपल्याकडे दोन किंवा तीन ईएमआय असतात तेव्हा आपली आर्थिक ताकद कमकुवत होते. तुम्ही सर्व वैयक्तिक, वाहन आणि कार्ड कर्ज एका कर्जामध्ये एकत्र करा. गृहकर्जावरील टॉप-अप व्याजाचा भार कमी करेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की गोष्टी हाताबाहेर जात आहेत, तेव्हा बँकेशी संपर्क साधा आणि उपायाचा विचार करा. कर्जाची पुनर्रचना आणि स्थगिती काही प्रमाणात दिलासा देऊ शकतात.
हेही वाचा :Benefits Of New Tax System : जुन्या कर प्रणालीपेक्षा नवीन कर प्रणाली तुमच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल, जाणून घेऊया सविस्तर