मुंबई: तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते, तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर: मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 77 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 27 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 31 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 47 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 97 पैसे आहे. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर हे काहीशा प्रमाणात जास्त आसतात.