मुंबई :गेल्या आठवड्यात ५८ हजार ८०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोने या आठवड्यात आत्तापर्यंत १७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारातही मोठी घसरण झाली आहे. वायदा आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोन्याची किंमत ५७ हजाराच्या आसपास आहे. ७ फेब्रुवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये वाढ झाली. बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रात १३५ रुपये किंवा ०.२४ टक्क्यांनी वाढले होते. आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात किंचीत वाढ दिसून येत आहे.
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ : ३ मार्च २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्येही १७८ रुपये किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढ झाली होती. फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे ५६ हजार ९५५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६७ हजार ३९९ रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. देशात सोने-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर ठरवले जातात. जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचे मोठे कारण आहे.