मुंबई :क्रिप्टो बाजार शुक्रवारी सलग लाल रंगात व्यवहार करत होता. बिटकॉइन 3.4 टक्क्यांवरून घसरून 21,860 डॉलरवर आला होता. तर इथेरिअम 1,550 डॉलरच्या खाली होता. शनिवारी बिटकॉईनचे व्हॉल्यूम 6.97 टक्क्यांनी वाढून 30.86 अब्ज डॉलर झाले. त्याचे मार्केट कॅप सुमारे 41.46 टक्क्यांच्या वर्चस्वासह सुमारे 421.65 अब्ज डॉलर होते. बिटकॉइनने गेल्या 24 तासांत 0.46 टक्के मूल्य गमावले आहे. जे 21,690.72 डॉलरवर व्यापार करत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते 7.07 टक्क्यांनी कमी आहे. इथेरिअम दुसरे सर्वात लोकप्रिय टोकन आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 1.19 टक्क्यांनी खाली आहे. आता ते 1,520.10 डॉलरवर व्यापार करत होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते 8.03 टक्क्यांनी कमी आहे. बिटकॉईऩ आणि इथेरिअमचे बाजार भांडवल अनुक्रमे 418.40 अब्ज डॉलर आणि 186.05 अब्ज डॉलर आहे.
क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर : 9 फेब्रुवारी रोजी बीटकॉइनची किंमत 19,00,300.36 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,36,557.38 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,952.07 रूपये होती. तेच 8 फेब्रुवारी रोजी रोजी हीच बीटकॉइनची किंमत 19,31,388.16 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,39,797.33 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,100 रूपये होती. तर 7 फेब्रुवारी रोजी हीच बीटकॉइनची किंमत 18,85,220.24 आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,33,958.24 रूपये होती. बायनान्सची किंमत 25,454.60 रूपये होती.