महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

RBI Monetary Policy Meeting : रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ३५ बेसिसने वाढ, कर्जाचा हप्ता महागणार - Repo Rate And Inflation Hike

(Reserve Bank of India) रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) आज चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांनुसार नवीन रेपो दर आणि इतर आर्थिक अंदाज जाहीर करतील. रेपो रेट वाढल्याने तुमच्या खिशावरचा भार वाढेल. ( RBI Monetary Policy Meeting 2022 Result )

Shaktikanta Das
गव्हर्नर शक्तिकांत दास

By

Published : Dec 7, 2022, 10:11 AM IST

Updated : Dec 7, 2022, 10:29 AM IST

नवी दिल्ली :भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आज चलनविषयक धोरण समितीचे निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. ( RBI Monetary Policy Meeting 2022 Result ) समितीच्या 6 पैकी 5 सदस्यांच्या बहुमताने रेपो दर 35 बेसिसने वाढविण्याचा निर्णय आरबीआयचे गर्व्हरन शक्तिकांत दास यांनी जाहीर केला आहे.

दर वाढवण्याची निवड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय एमपीसीची बैठक सोमवारी झाली.( RBI Monetary Policy Meeting ) गेल्या काही महिन्यांत रेपो दरात अनेक वेळा वाढ केल्यानंतर, RBI या पतधोरण आढाव्यात दर वाढवण्याची निवड करू शकते. पूर्वी केलेल्या वाढीच्या तुलनेत, रेपो दरातील नवीन वाढ कमी असण्याची शक्यता आहे. महागाई कमी होण्याची चिन्हे पाहता आज आरबीआय रेपो दरात पूर्वीपेक्षा कमी वाढ जाहीर करेल, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

आरबीआय महागाई दर आणि जीडीपीचे अंदाज :या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर चालू आर्थिक वर्ष आणि आगामी काळातील महागाई दराचा अंदाजही जारी करतील. आर्थिक तज्ज्ञ आणि सर्वसामान्य जनताही यावर लक्ष ठेवणार आहे.

Last Updated : Dec 7, 2022, 10:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details