नवी दिल्ली: महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) लिमिटेडने जाहीर केले आहे की त्यांच्या नवीन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलचे कोडनेम Z101 म्हणजेच स्कॉर्पियो-एन ( Scorpio-N )ओळखले जाईल. येत्या 27 जून 2022 रोजी लॉन्च केले जाईल. त्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर आनंद महिंद्रा यांनी आपल्या नवीन स्कॉर्पिओबद्दल एक मजेदार ट्वविट केले ( Anand Mahindra funny tweet )आहे.
अलीकडेच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी SUV च्या बिग डॅडीबद्दल ( Big Daddy Of SUVs ) एक मजेदार ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, रोहित शेट्टी जी, ही कार उडवण्यासाठी अणुबॉम्ब लागेल. खरं तर, रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये कारचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट दिग्दर्शकासाठी केले आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की आगामी स्कॉर्पिओ एन खूप मजबूत असणार आहे.
कंपनीच्या एका निवेदनात म्हटले आहे की, सध्याची स्कॉर्पिओ, जी गेल्या दोन दशकांमध्ये एक प्रतिष्ठित आणि कल्ट ब्रँड म्हणून विकसित झाली आहे, ती स्कॉर्पिओ क्लासिक म्हणून सुरू राहील. वेलुसामी, अध्यक्ष, ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, M&M म्हणाले की, नवीन स्कॉर्पिओ-एन हे महिंद्रासाठी एक महत्त्वाचे वाहन ( Scorpio-N important vehicle for Mahindra ) आहे, जे भारतातील SUV विभागाला पुन्हा परिभाषित करण्यासाठी तयार आहे.
महिंद्रा अँड महिंद्राची नवीन स्कॉर्पिओ एन
स्कॉर्पिओ-एन स्पिरिटेड गॅसोलीन आणि डिझेल इंजिनद्वारे चालणारी ( Scorpio-N spirited gasoline and diesel engines ) असेल. ज्यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय असेल. कंपनीच्या प्रकाशनात असे म्हटले आहे की, ते 4x4 पर्यायासह सादर केले जाईल.
हेही वाचा -Cut In Excise Duty : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 तर डिझेलवर 6 रुपयांची कपात