महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Education Inflation : महागाईचा आपल्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ देऊ नका, करा हे उपाय

तुमच्या मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक गरजांसाठी आठ ते दहा वर्षे आधीच आर्थिक तयारी करा. त्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करणे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक खर्चापेक्षा जास्त रिटर्न मिळेल. त्यासाठी तुम्ही कोणत्या योजना निवडू शकता हे वाचा.

Education
शिक्षण

By

Published : Mar 3, 2023, 8:54 AM IST

हैदराबाद : महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणाचा खर्च वर्षागणिक वाढत आहे. तुमच्या मुलांच्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही अनेक वर्षे आधीच नियोजन केले पाहिजे. दीर्घकालीन योजनांमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्याने तुमची मुले महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही शैक्षणिक महागाईच्या वाढीवर मात करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार व्हाल. यासाठी तुम्हाला काय करायला हवे ते जाणून घ्या.

सोन्याची गुंतवणूक :सोने किंवा चांदीचे ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) घेतल्यास, तुमच्या भविष्यातील गरजांची काळजी घेतली जाईल. गोल्ड म्युच्युअल फंड देखील उपलब्ध आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत हे फारसे फायदेशीर नसतात. या प्रकरणात, बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज आणि हायब्रिड इक्विटी फंडांचा विचार केला जाऊ शकतो. त्यांचा कार्यकाळ 8 वर्षांचा असल्याने चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही 8 वर्षांसाठी 10,000 रुपये दरमहा दराने गुंतवणूक केल्यास, 10 टक्के रिटर्नसह रुपये 13,72,300 मिळू शकतात.

जास्त रिटर्न :अनेक जोडप्यांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील गरजांसाठी आधी पुरेसे संरक्षण पुरवायचे असते. यासाठी तुमच्या नावावर योग्य रकमेची जीवन विमा पॉलिसी घ्या. सध्या शिक्षण अत्यंत महाग झाले आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोठेही गुंतवणूक करताना हे सुनिश्चित केले पाहिजे की रिटर्न शैक्षणिक महागाईपेक्षा जास्त आहे. आणखी 15 वर्षांनी तुमच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज भासेल. त्यामुळे तुम्ही डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. यात काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती असली तरीही चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही कमीत कमी 15 वर्षांसाठी दरमहा 15,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 12 टक्के रिटर्नसह 67,10,348 रुपये मिळू शकतात.

लाइफ कव्हर्स आणि एसआयपी :ज्या व्यक्तीला त्याच्या 40,000 रुपयांच्या पगारातून 5,000 रुपये गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना आहेत. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान 10-12 पट जीवन विमा पॉलिसी घेतली पाहिजे. कमी प्रीमियमसह अधिक संरक्षण देणाऱ्या टर्म पॉलिसींचा यासाठी विचार केला जाऊ शकतो. चांगला पेमेंट इतिहास असलेल्या दोन कंपन्यांकडून विमा पॉलिसी घ्या. वैयक्तिक अपघात विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी देखील असायला हव्यात. तुम्हाला डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांमध्ये गुंतवायचे असलेल्या ५ हजार रुपयांपैकी ३ हजार रुपये SIP मध्ये गुंतवा. उर्वरित २ हजार रुपये पीपीएफमध्ये जमा करा.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवी मॅच्युअर झाल्यानंतर त्यांच्यासमोर काही पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षित 9 टक्के परतावा योजना सध्या उपलब्ध नाहीत. काही बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर ७.५० टक्के व्याज देत आहेत. याला पर्याय म्हणून तुम्ही 8 टक्के व्याज देणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना विचारात घेऊ शकता.

हेही वाचा :SC Order to Probe Adani Group : अदानी प्रकरणाच्या चौकशीचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, सहा सदस्यीय समितीची स्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details