महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Adani Group Shares Dropped: अदानी समूहाचे शेअर्स गडगडले.. डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळल्याचा परिणाम - आजचे शेअर बाजार ओपनिंग

अदानी समूहाचे शेअर्स आज पुन्हा गडगडले आहेत. डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून अदानी समूहाला वगळल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे अदानी समूह अडचणीत आला आहे.

Adani Group Shares Dropped
अदानी समूहाचे शेअर्स गडगडले.

By

Published : Feb 3, 2023, 12:33 PM IST

मुंबई : शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर गडगडले आहेत. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालमत्तेत गेल्या आठवड्यापासून घट होत आहे. शुक्रवारच्या सकाळच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 236 अंकांनी वधारून 60,185.49 वर गेला तर NSE निफ्टी 50 17 अंकांनी वाढून 17,627.80 च्या पातळीवर गेला. सकाळपासूनच आर्थिक साठा तेजीत होता.

आजचे शेअर बाजार अपडेट्स:बँकिंग समभागांची खरेदी आणि अमेरिकन बाजारातील मजबूतीमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वाढले. यादरम्यान बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ४८१.९४ अंकांनी वाढून ६०,४१४.१८ अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, NSE निफ्टी 118.05 अंकांनी वाढून 17,728.45 वर होता. गुरुवारी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स २२४.१६ अंकांच्या म्हणजेच ०.३८ टक्क्यांच्या वाढीसह ५९,९३२.२४ वर बंद झाला. त्याच वेळी, 50 शेअर्सचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5.90 अंकांच्या किंवा 0.03 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 17,610.40 अंकांवर बंद झाला.

कोणते शेअर्स नफ्यात कोणते तोट्यात:सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे प्रमुख वधारले. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस आणि नेस्ले यांचे समभाग घसरले. अदानी समूहाचे शेअर्स घसरत असल्याने गुंतवणूकदारांकडून आता इतर कंपन्यांना प्राधान्य देण्यात येत आहे.

अडाणी इंटरप्रायझेस, अदानी ग्रीनचे शेअर्सची तोट्यात:अदानी समूहाची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स शुक्रवारी सकाळी 27.47 टक्क्यांनी घसरून प्रत्येकी 1,143.50 रुपये झाला. उपलब्ध आकडेवारीनुसार, केवळ पाच सत्रांमध्ये, तो 1,926.55 रुपयांपेक्षा जास्त कमी झाला आहे. म्हणजेच जवळपास 62 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अदानी ग्रीनचा समभाग 10 टक्क्यांनी घसरून 935.90 रुपयांवर आला. अवघ्या पाच दिवसांत तो 392.30 रुपयांनी कमी झाला म्हणजेच 29.54 टक्क्यांनी घसरला.

अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरले:शुक्रवारी सकाळी अदानी पोर्ट्स आणि सेझचे समभाग 39.95 रुपयांनी कमी झाले म्हणजेच 8.12 टक्क्यांनी घसरून 424.90 रुपयांवर आले. पाच दिवसांच्या कालावधीत कंपनीचे शेअर्स 227.20 रुपये किंवा 35 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून प्रत्येकी 1,396 रुपयांवर आले. फर्मला केवळ 5 दिवसात प्रति शेअर्स 371.25 रुपयांचा तोटा झाला किंवा 21 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदरांमध्ये विश्वास वाढवण्याचे काम सुरु:FMCG फर्म अदानी विल्मर शुक्रवारी सकाळी 5 टक्क्यांनी घसरून प्रत्येकी 399 रुपयांवर आली तर पाच दिवसांच्या कालावधीत ती 91 रुपयांनी कमी झाली किंवा 18.54 टक्क्यांहून अधिक घसरली. दुसर्‍या घडामोडीत, अदानी समूहाने गुरुवारी थकबाकीदार यूएस डॉलर-नामांकित बाँडवर नियोजित कूपन पेमेंट केल्याचे सांगितले जात आहे. असे करून अदानी समूहातर्फे त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास वाढवण्याचे काम सुरु असल्याचे दिसते.

डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स:अदानी एंटरप्रायझेसला यूएस मार्केटच्या डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळण्यात आले. या निर्णयामुळे अदानी समूहाला मोठा झटका बसणार आहे. अमेरिकी शेअर बाजारात याचा परिणाम दिसून येत आहे. अदानी एंटरप्रायझेस ७ फेब्रुवारी २०२३ पासून या निर्देशांकात व्यापार करणार नाही. त्यामुळे अदानी समूहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अमेरिकन शेअर बाजाराने आपल्या निर्देशांकात या बदलाची माहिती दिली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Adani dropped from Dow Jones: अदानी समूहाला मोठा झटका, अदानी एंटरप्रायझेस डाऊ जोन्सच्या सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर

ABOUT THE AUTHOR

...view details