मुंबई : आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सोनेची किंमत ₹5,235, 8 ग्रॅम ₹41,880, 10 ग्रॅम ₹52,350 , 100 ग्रॅम ₹5,23,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,711 , 8 ग्रॅम ₹45,688 , 10 ग्रॅम ₹57,110 , 100 ग्रॅम ₹5,71,100 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,230, मुंबईत ₹52,350, दिल्लीत ₹52,400, कोलकाता ₹52,500, हैदराबाद ₹52,350 आहेत. तसेच चांदीचे आजचे दर हे असे आहेत.1 ग्रॅम ₹72.30 , 8 ग्रॅम ₹578.40 , 10 ग्रॅम ₹723 , 100 ग्रॅम ₹7,230, 1 किलो ₹72,300 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचे दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹747, मुंबईत ₹723 , दिल्लीत ₹723, कोलकाता ₹723, बंगळुरू ₹747, हैद्राबाद ₹747 आहेत.
स्वर्णरेखा नदीतून सोने बाहेर येते: भारतात शेकडो छोट्या-मोठ्या नद्या आहेत. भारतात एक नदी आहे ज्या नदीतून सोने बाहेर येते. नदीच्या आसपास राहणारे लोक सोने काढून विकतात आणि पैसे कमवतात. मात्र नदीमध्ये सोने कुठून येते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केले, पण सोने कोठून येते, हे मात्र अद्याप गूढच आहे. ही सोन्याची नदी झारखंड राज्यात वाहते आणि तिचे नाव स्वर्णरेखा नदी असे आहे. सोन्याच्या उपलब्धतेमुळे या नदीला स्वर्णरेखा नदी दिले आहे. ही नदी झारखंडशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथेही वाहते. ही नदी झारखंडची राजधानी रांचीपासून १६ किमी अंतरावर उगम पावते आणि थेट बंगालच्या उपसागरात येते. झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी ज्या भागातून जाते त्या भागात लोक पहाटेच जातात आणि वाळू गाळून सोने गोळा करतात.लोक अनेक पिढ्यांपासून सोने काढून पैसे कमवत आहेत. एवढेच नव्हे तर नदीतून सोने बाहेर काढण्यात स्त्री-पुरुषांशिवाय लहान मुलेही हे काम करतात.