नवी दिल्ली Flipkart Republic Day Sale 2024 : प्लिपकार्टचा वर्षातील पहिला सेल सुरू झाला आहे. 14 जानेवारीपासून 'फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल 2024' ला सुरुवात झाली. हा सेल 19 जानेवारीपर्यंत सुरू राहील. या सेलदरम्यान केवळ स्मार्टफोनवरच नव्हे तर अॅक्सेसरीज, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य उत्पादनं, टीव्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि इत्यादी बऱ्याच काही गोष्टींवर प्रचंड सवलत आणि ऑफर उपलब्ध आहेत.
आयफोन 15 वर भव्य डिस्काउंट : या सेलमध्ये अॅप्पलचा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन, आयफोन 15 तसेच सॅमसंगचा लोकप्रिय फोन, Samsung Galaxy S21 FE वर भव्य डिस्काउंट मिळत आहेत. सेलमध्ये लेटेस्ट iPhone 15 फक्त 65,999 रुपयात उपलब्ध आहे, जी या फोनची आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. अॅप्पल स्टोअरवर या फोनची किंमत 79,900 रुपयांपेक्षा जास्त आहे. यासह, आयसीआयसीआय किंवा बँक ऑफ बडोदाचं क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 750 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.