महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Finance Minister Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वत: बाजारात भाजी खरेदी करताना; पाहा व्हिडीओ - वित्त मंत्री निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी अचानक चेन्नईच्या (Sitharamans Visit to Chennai) मायलापूर भाजी मंडईत दाखल ( Finance Minister in Mylapore Market ) झाल्या. तेथे त्या केवळ भाजी विक्रेत्यांशीच बोलल्या नाहीत, तर भाजी खरेदी करतानाही ( Finance Minister in Vegetable Market ) दिसल्या. त्यांनी स्थानिक विक्रेत्यांकडून भाज्यांचे दरसुद्धा जाणून घेतले.

Finance Minister Nirmala Sitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वत: बाजारात भाजी खरेदी करताना

By

Published : Oct 9, 2022, 7:50 PM IST

चेन्नई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे शनिवारी चेन्नईत (Sitharamans Visit to Chennai) आगमन झाले. त्यांच्या भेटीदरम्यान, त्या स्थानिक मायलापूर भाजी मार्केट ( Finance Minister in Mylapore Market ) येथे पोहोचल्या. ज्याचा ( Finance Minister in Vegetable Market ) व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. भाजी मार्केटमध्ये त्यांनी विक्रेते आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी भाजी खरेदी करताना भाजीचे भाव करून भाजीसुद्धा खरेदी केली.

अर्थमंत्र्यांनी भाजी खरेदी करताना भाज्यांची विशेष चौकशी करीत, चांगल्या प्रकारची भाजी खरेदी केली. भाज्यांचे स्थानिक बाजारात किती आहेत याचीसुद्धा त्यांनी चौकशी केली. स्वतः भाजी खरेदी करीत स्थानिक भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला.

नंतर, अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये ते बाजारातून भाजी घेताना दिसत आहेत, तर स्थानिक लोक त्यांना पाहून तेथे पोहोचले आणि त्यांचे स्वागत केले. सीतारामन यांनी भाजी विक्रेते आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला. त्यांना बाजारात पाहून स्थानिकांना, भाजी विक्रेत्यांना आनंद झाला. अर्थमंत्री एकटेच बाजारात पोहोचले होते, असे नाही. त्यांच्यासोबत अंगरक्षकही उपस्थित होते. अर्थमंत्री सीतारामन भाजीपाला खरेदी केल्यानंतर स्वतः महागाई तपासण्यासाठी येथे आल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details