महाराष्ट्र

maharashtra

Elon Musk Vs Twitter : ट्विटरसोबतचा सौदा रद्द करण्याची एलोन मस्क यांची घोषणा.. ट्विटर जाणार कोर्टात

By

Published : Jul 9, 2022, 7:39 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा सौदा रद्द करत असल्याचे जाहीर केलं ( Elon Musk terminating deal for Twitter ) आहे. बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पुरेशी माहिती प्रदान करण्यात ट्विटर कंपनी अयशस्वी ठरल्यानंतर मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी $44 अब्जचा करार संपवत असल्याचे जाहीर केले. त्याच वेळी, ट्विटरने म्हटले आहे की, करार कायम ठेवण्यासाठी ते मस्क यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहेत.

Elon Musk Vs Twitter
एलोन मस्क ट्विटर

वॉशिंग्टन: अब्जाधीश टेस्ला प्रमुख एलोन मस्कच्या टीमने ट्विटरला पाठवलेल्या पत्रानुसार, खरेदी कराराच्या अनेक उल्लंघनांचा हवाला देत इलॉन मस्क ट्विटर विकत घेण्यासाठी USD चा ४४ अब्ज डॉलरचा करार रद्द केला ( Elon Musk terminating deal for Twitter ) आहे. एप्रिलमध्ये, मस्कने ट्विटरसोबत $54.20 प्रति शेअर दराने सुमारे $44 अब्ज डॉलर्सचा एक अधिग्रहण करार केला होता.

५ टक्के खाती बॉट्स :तथापि, प्लॅटफॉर्मवरील 5 टक्क्यांहून कमी खाती बॉट्स किंवा स्पॅम आहेत या ट्विटरच्या दाव्याच्या सत्यतेचे पुनरावलोकन करण्याची परवानगी देण्यासाठी मस्कने मे मध्ये करार थांबवला. त्याच वेळी, ट्विटरने ताबडतोब प्रतिसाद दिला की ते करार ठेवण्यासाठी टेस्ला सीईओवर दावा दाखल करणार आहेत.

कंपनीचे निवेदन :"ट्विटरने विलीनीकरणाच्या कराराच्या अटींनुसार व्यवहार पूर्ण करण्यासाठी मस्कशी सहकार्याने माहिती सामायिक करणे सुरू ठेवले आहे," कंपनीने जूनमध्ये एका निवेदनात म्हटले आहे. मस्कने आरोप केला आहे की, स्पॅम खात्यांची खरी संख्या खूप जास्त आहे. 90 टक्क्यांपर्यंत खाती स्पॅम आहेत. मस्कने यापूर्वी म्हटले आहे की, कंपनी जोपर्यंत स्पॅम मेट्रिक्सचा पुरावा देत नाही तोपर्यंत अधिग्रहण पुढे जाऊ शकत नाही. यापूर्वी, मस्कने स्पॅम बॉट्सला प्लॅटफॉर्मवर मध्यवर्ती समस्या बनवली होती.

हेही वाचा :Elon Musk Bought Twitter : उद्योगपती इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक! 44 अब्ज डॉलरला केले खरेदी

ABOUT THE AUTHOR

...view details