वॉशिंग्टन : मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतल्यानंतर अब्जाधीश एलन मस्क यांनी पुन्हा एकदा मजेशीर ट्विट केले आहे. ट्विटरनंतर आता मी कोकाकोला तसेच मॅकडोनाल्ड्स 'आइस्क्रीम मशीन्स ठीक करण्यावर" लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मिडीयावर यांची ही मजेदार पोस्ट अत्यंत व्हायरल होत आहे. आणि यावर नेटकरी याची मजा घेत आहेत.
"पुढे मी कोकेन परत घेण्यासाठी कोका-कोला विकत घेत आहे असेही एलन मस्क यांनी ट्विट केले. यानंतर पुढे ते म्हणाले की, "ऐका, मी चमत्कार करू शकत नाही". नंतर त्यांनी यूजर्सना ट्विटरवर जास्त मजा येणार असल्याचेही आश्वासन दिले.
ट्विटरवर सक्रीय
अब्जाधीस एलन मस्त अनेकदा ट्विटरवर विविध सामाजिक मुद्दयांवर आपली मते मांडत असतात. त्यांची ट्विट ही अनेकदा चर्चेचा मुद्दाही बनतात. दोन दिवसात एलन मस्क यांनी टेविटर खरेदी केल्यावर त्यांच्या ट्विटर पोस्ट बातम्यांचे मुद्दे बनत आहेत. त्यांनी नुकतीच ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट खरेदी करण्यासाठी 44 अब्ज डॉलर्स एवढी किंमत मोजली.
#LeavingTwitter हा हॅशटॅग चर्चेत
नेक आठवडे सुरू असलेल्या तर्क-वितर्कांनंतर अखेर टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी प्रतिष्ठित करार केला. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि त्यांच्या मंडळाने सुरुवातीला मस्कच्या ताब्यात घेण्याच्या बोलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, विचारविनिमय केल्यानंतर, मस्क यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. या घोषणेनंतर लगेचच #LeavingTwitter हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. लोकांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर जाऊन घोषणा केली की ते ट्विटर सोडत आहेत.
हेही वाचा -Elon Musk : ट्विटरच्या सार्वजनिक विश्वासासाठी ते राजकीयदृष्ट्या तटस्थ असावे -इलॉन मस्क