महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 15, 2020, 1:31 PM IST

Updated : Jun 15, 2020, 2:16 PM IST

ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेत मे महिन्यात महागाईत ३.२१ टक्के घसरण

सरकारी आकडेवारीनुसार प्राथमिक घटकांच्या निर्देशांकात मे महिन्यात मार्चच्या तुलनेत 0.87 टक्के घसरण झाली आहे. प्राथमिक घटकांच्या वर्गवारीत घाऊक किंमत निर्देशांक मार्चमध्ये 137.4 टक्के होता. तर याची मे महिन्यात 136.2 टक्के नोंद झाली आहे.

Wholesale price Index
घाऊक किंमत निर्देशांक

नवी दिल्ली– सरकारी आकडेवारीनुसार घाऊक बाजारपेठेतील महागाई मे महिन्यात घसरल्याचे समोर आले आहे. वार्षिक महागाईवर आधारित मे महिन्यात घाऊक किंमत (होलसेल प्राईज इंडेक्स) निर्देशांक 3.21 टक्क्यांनी घसरला आहे. गतवर्षी मे महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक 2.79 टक्के होता.

सरकारी आकडेवारीनुसार प्राथमिक घटकांच्या निर्देशांकात मे महिन्यात मार्चच्या तुलनेत 0.87 टक्के घसरण झाली आहे. प्राथमिक घटकांच्या वर्गवारीत घाऊक किंमत निर्देशांक मार्चमध्ये 137.4 टक्के होता. तर याची मे महिन्यात 136.2 टक्के नोंद झाली आहे. असे असले तरी अन्नाच्या किमती या 0.73 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने अन्नाच्या किमती वाढल्या आहेत. तर बिगर अन्नाच्या वर्गवारीत मार्च 2020 च्या तुलनेत घसरण झाली आहे.

अन्न निर्देशांकात प्राथमिक घटक आणि उत्पादकांपासून तयार केलेल्या अन्न उत्पादनाचा समावेश आह. हा अन्न निर्देशांक मार्चमध्ये 145.7 होता. तर मार्च 2020 मध्ये 146.1 एवढा अन्न निर्देशांक होता. वार्षिक महागाईवर आधारित अन्नाच्या वर्गवारीतील घाऊक किंमत निर्देशांक हा मार्चमध्ये 5.20 टक्के होता. तर मे 2020 मध्ये 2.31 टक्के होता.

इंधन आणि उर्जा क्षेत्रालीत महामाई ही 15.88 टक्क्यांनी घसरली आहे. तर मार्च महिन्यात या वर्गवारीतील महागाई ही 99.5 टक्के होती. खनिज, तेलाच्या वर्गवारीत मार्चच्या तुलनेत महागाई ही 30.10 टक्क्यांनी घसरली आहे. तर कोळसा आणि वीज निर्मितीमधील महागाई स्थिर राहिली आहे.

घाऊक किंमत निर्देशांकातील (डब्ल्यूपीआय) महागाईची फेब्रुवारीमध्ये 2.26 टक्के नोंद झाली होती. अन्नधान्य आणि पालेभाज्यांचे दर घसरल्याने घाऊक बाजारातील महागाई कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीमधून समोर आले होते. दरम्यान, देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन व उद्योगांचे उत्पादन विस्कळित झाले आहे. त्याचा नागरिकांसह देशाच्या अर्थव्यस्थेला फटका बसला आहे.

Last Updated : Jun 15, 2020, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details