सिंगापूर - जगभरातील देश कोरोनाच्या संकटाने टाळेबंदीत असल्याने खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या खनिज तेलाची किंमत प्रति बॅरल १५ डॉलरहून कमी झाली आहे. हा गेल्या २० वर्षांमधील सर्वात कमी दर आहे.
अमेरिकेच्या खनिज तेल किमतीचा निर्देशांक (वेस्ट टेक्सास इंटरमिडियट) हा १९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल हा १४.७३ डॉलर झाला आहे. यापूर्वी हे दर प्रति बॅरल १५.७८ डॉलर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर ४.१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल २६.९३ डॉलर झाले आहेत. यापूर्वी प्रति बॅरलचा दर हा २८.११ डॉलर होता.