नवी दिल्ली - टोमॅटोच्या किमती दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये घसरल्या आहेत. या शहरामधील विविध भाजीमंडईत टोमॅटोचे दर प्रति किलो ४ ते १० रुपयापर्यंत शुक्रवारी घसरले आहेत. हा गेल्या तीन वर्षातील टोमॅटोला मिळालेला नीचांकी भाव आहे.
गतवर्षी राजधानीमधील आझादपूर येथे घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचा भाव प्रति किलो १४.३० रुपये आहे. तर हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव प्रति किलो ३० रुपयांहून अधिक होता. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक झाली आहे. त्यामुळे नाशवंत असलेल्या टोमॅटोचे दर घसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हेही वाचा-आरबीआयकडून दिलासा; कर्जदारांना पैसे भरण्याकरता आणखी तीन महिन्यांची मुदत