महाराष्ट्र

maharashtra

टाळेबंदीत अक्षय तृतीया : सोने खरेदीकरिता 'या' ज्वेलर्सने दिला ऑनलाईन पर्याय

By

Published : Apr 20, 2020, 9:56 AM IST

तनिष्कच्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून १८ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान मौल्यवान दागिन्यांची विक्री करण्यात येणार आहे. ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केल्यानंतर टाळेबंदी हटल्यानंतर ग्राहकांना स्टोअरमधून दागिने घेता येणार आहेत. तसेच टाळेबंदीनंतर घरपोहोच दागिने देण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सोने विक्री
सोने विक्री

बंगळुरू - अक्षयतृतीयेनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. टाळेबंदी असल्याने २६ एप्रिलला अक्षय तृतीयेनिमित्त ग्राहकांची गैरसोय होवू नये, याकरता काही ज्वेलर्सने ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये टाटा ग्रुपची तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्स यांचा समावेश आहे.

तनिष्कच्या ई-कॉमर्स वेबसाईटवरून १८ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान मौल्यवान दागिन्यांची विक्री करण्यात येणार आहे. ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केल्यानंतर टाळेबंदी हटल्यानंतर ग्राहकांना स्टोअरमधून दागिने घेता येणार आहेत. तसेच टाळेबंदीनंतर घरपोहोच दागिने देण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

हेही वाचा-टाळेबंदीने अडकलेल्या मजुरांना राज्यांतर्गत प्रवास करता येणार, पण...

कल्याण ज्वेलर्सने ऑनलाईन खरेदी केल्यानंतर सोन्याच्या मालकीचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दशकभरात पहिल्यांदाच टाळेबंदी असल्याने सोन्याची दुकाने बंद आहेत. ग्राहकांकडून सोने खरेदीबाबत सोशल मीडियावरून सतत विचारणा होत असल्याचे कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. कल्याणरामन यांनी सांगितले. ही वेबसाईट २१ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या सल्ल्यानंतर 'महाराजा'कडून बुकिंगला ब्रेक

ABOUT THE AUTHOR

...view details