महाराष्ट्र

maharashtra

इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग

एकाच महिन्यात तिसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर देशात एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ७९४ रुपये आहे. यापूर्वी बुधवारी गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपये होती

By

Published : Feb 25, 2021, 4:28 PM IST

Published : Feb 25, 2021, 4:28 PM IST

ETV Bharat / business

इंधनाच्या महागाईनंतर दुसरा झटका: गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महाग

LPG price
गॅस सिलिंडर किंमत

नवी दिल्ली - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य होरपळत असताना गॅस सिलिंडरही महागले आहे. स्वयपांक घरातील अनुदानित व विनाअनुदानित एलपीजी गॅसची किंमत २५ रुपयाने वाढली आहे. यामध्ये उज्जवला योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एलपीजी गॅसचाही समावेश आहे.

एकाच महिन्यात तिसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर देशात एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. दिल्लीत १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत ७९४ रुपये आहे. यापूर्वी बुधवारी गॅस सिलिंडरची किंमत ७६९ रुपये होती. या दरवाढीची माहिती सरकारी विपणन कंपनीने विक्रेत्यांना दिली आहे. गॅस सिलिंडरमधील दरवाढ ही अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व श्रेणीतील सिलिंडरसाठी लागू आहे.

हेही वाचा-ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भांडवलीकरण करण्याची गरज-शक्तिकांत दास

महानगरांमध्ये बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो गॅस सिलिंडर

एलपीजीचे दर संपूर्ण देशात एकच आहेत. मात्र, सरकारकडून काही प्रमाणात ग्राहकांना अनुदान देण्यात येते. काही वर्षांत महानगर आणि मोठ्या शहरांमध्ये गॅस सिलिंडरवरील अनुदान काढण्यात आले आहे. दिल्लीमधील एलपीजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही अनुदान मिळत नाही. ग्राहकांना बाजार भावाप्रमाणे गॅस सिलिंडर ७९४ रुपयांनी खरेदी करावा लागतो.

हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 2.69 लाख कोटींची भर

सरकारी तेल कंपनीमधील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार दुर्गम भागातील ग्राहकांना अंशत: अनुदान दिले जाते. चालू महिन्यात प्रथम ४ फेब्रुवारीला गॅस सिलिंडरचे दर २५ रुपयांनी तर १५ फेब्रुवारीला ५० रुपयांनी वाढले होते. डिसेंबरपासून गॅस सिलेंडरचे दर १५० रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान, पेट्रोल व डिझेलचे दर आज स्थिर राहिले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.९३ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ८१.३२ रुपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details