महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाची चिंता असूनही शेअर बाजार ४७९.६८ अंशांनी वधारला; हे आहे कारण

By

Published : Mar 3, 2020, 5:11 PM IST

शेअर बाजाराने दिवसभरात अत्यंत चढ-उतार अनुभवला आहे. निफ्टीचा निर्देशांक १७०.५५ अंशांनी वधारून ११,३०३.३० वर स्थिरावला.

Bombay Stock Market
मुंबई शेअर बाजार

मुंबई - सलग सात सत्रात शेअर बाजाराची सुरू असलेली घसरण आज थांबली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४८० अंशांनी वधारून 38,623 वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत.

शेअर बाजाराने दिवसभरात अत्यंत चढ-उतार अनुभवला आहे. निफ्टीचा निर्देशांक १७०.५५ अंशांनी वधारून ११,३०३.३० वर स्थिरावला.

हेही वाचा-एजीआर : टाटाचे २ हजार कोटी तर व्होडाफोनकडून ३,०४३ कोटी सरकारकडे जमा

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

सन फार्मा, टाटा स्टील, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले आहेत. आयटीसी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर घसरले आहेत. कोरोनाने देशातील होणाऱ्या परिणामांवर जवळून देखरेख करीत असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. वित्तीय बाजाराच्या कामकाजासाठी योग्य ती पावले घेण्यासाठी तयार असल्याचे आरबीआयने महटले आहे.

हेही वाचा-७,७९६ कोटी रुपयांची खोटी जीएसटी बिले: अधिकाऱ्यांकडून 'गोरखधंदा' उघडकीस

ABOUT THE AUTHOR

...view details