मुंबई - कोरोनाचे संकट असताना आर्थिक पॅकेज जाहीर होईल, या आशेने मुंबई शेअर बाजार सावरला आहे. मुंबई शेअर बाजार ६९२.७९ अंशांनी वधारून २६,६७४.९३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १९०.८० अंशांनी वधारून ७,८०१.०५ वर स्थिरावला. कोरोनाचा प्रसार वाढत असताना लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषणा केली.
शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात १,२०० अंशांनी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने ३,९०० च्या घसरणीनंतर आजपर्यंतची सर्वात घसरण सोमवारी अनुभवली होती. त्यानंतर शेअर बाजार आज सावरला आहे. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १,२७४.४५ अंशांनी वधारून २७,२५५.६९ वर स्थिरावला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना २५,९८१.२४ वर स्थिरावला होता. विमान कंपन्यांचे शेअर १० टक्क्यापर्यंत घसरले आहेत. सरकारने देशातील विमान उड्डाणे २५ टक्क्यापर्यंत रद्द केले आहेत. त्याचा फटका विमान कंपन्यांच्या शेअरला बसला आहे.
हेही वाचा-घरून काम करण्यासाठी जिओचे प्रोत्साहन; ब्रॉडबँडकरता दिली ऑफर