मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४८७ अंशाने घसरला. वित्तीय आणि वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४८७.४३ अंशाने घसरून ५०,७९२.०८ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४३.८५ अंशाने घसरून १५,०३०.९५ वर स्थिरावला.
या कंपन्यांचे वधारले -घसरले शेअर-
बजाज ऑटोचे शेअर सर्वाधिक सुमारे तीन टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ मारुती, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, ओएनजीसी, टायटन आणि इन्फोसिसचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉनकडून डिजीटल देयक व्यवहारात २२५ कोटींची गुंतवणूक
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीने गुंतवणुकदारांची वाढली चिंता
रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले की, जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असल्याने शेअर बाजार खुला होताना निर्देशांक वधारला. तर शेअर विक्रीचा दबाव असल्याने वित्तीय आणि वाहन कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. अमेरिकेतील रोख्यांतून मिळणाऱ्या परताव्याचे वाढलेले प्रमाण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीने शेअर बाजार गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेअर बाजारात अस्थिरता राहणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किमती तेराव्या दिवशीही स्थिर
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.०९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६९.५७ डॉलर आहेत.