मुंबई - शेअर बाजाराची पडझड सलग सहाव्या सत्रात सुरुच राहिली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी तणावाची स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणुकदरांच्या गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याचे दिसून आले. शेअर बाजार ४८८ अंशाने गडगडून ३७,७८९.१३ वर बंद झाला. निफ्टीच्या निर्देशांकातही १३९ अंशाची घसरण झाली. शेअर बाजार बंद होताना निफ्टी ११,३५९.४५ वर पोहोचला.
निर्देशांकात घसरण झाल्याने सर्वात अधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये ३.३५ टक्के घसरण झाली. त्यानंतर बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एसबीआय आणि वेदांता या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. एशियन पेंट्स, एचसीएल टेक आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर केवळ वधारले आहेत.