मुंबई- शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ६०० अंशांनी उसळला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एल अँड टीचे शेअर वधारल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
कोरोनामुळे देशातील शेअर बाजारावर परिणाम होत आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६३९.८३ अंशांनी वधारून ३१,४००.३६ वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १८७.२० अंशांनी वधारून ९,१८१.०५ वर पोहोचला.
हेही वाचा-देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका; २०२० मध्ये १.९ टक्के विकासदर - आयएमएफचा अंदाज
सन फार्माचे सर्वाधिक ५ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ एल अँड टी, एचयूएल, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सुमारे ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा-लॉकडाऊनमध्ये दिलासा; 'या' चार शहरामध्ये सुरू होणार उबेरची प्रवास सेवा
ओएनजीसी, मारुती, कोटक बँक आणि टायटनचे शेअर घसरले आहेत. मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६९.६० अंशांनी घसरून ३०,६९०.०२ वर स्थिरावला होता. तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद होता. मागील सत्रात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सुमारे १,२४३.७४ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती.