महाराष्ट्र

maharashtra

मुंबई शेअर बाजारात ५०० अंशाची उसळी : मध्यपूर्वेतीत तणाव कमी होण्याच्या शक्यतेचा परिणाम

By

Published : Jan 9, 2020, 12:39 PM IST

एसबीआयचे सर्वाधिक २.१९ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ इंडुसइंड बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसी बँक, एल अँड टी, अ‌ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी ट्विन्सचे शेअर वधारले.

Bombay Stock Exchange
मुंबई शेअर बाजार

मुंबई -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणचे नेतृत्व आणि लोकांना सकारात्मक संदेश दिला आहे. मध्यपूर्वेतील तणाव निवळणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४७२.८३ अंशाने वधारून ४१,२९०.५७ वर पोहोचला.

निफ्टीचा निर्देशांकही १३९.९० अंशाने वधारून १२,१६५.२५ वर स्थिरावला.

हेही वाचा-मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एसबीआयचे सर्वाधिक २.१९ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ इंडुसइंड बँक, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसी बँक, एल अँड टी, अ‌ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी ट्विन्सचे शेअर वधारले. टीसीएसचे शेअर घसरले. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बुधवारी ५१.७३ अंशाने घसरून ४०,८१७.१४ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ५१५.८५ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ७४८.४० कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

हेही वाचा-उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे 'मुख्यमंत्र्यांकडून उद्योगपतींना आश्वासन'


गेली काही दिवस अमेरिका-इराणमध्ये तणावाची स्थिती असल्याने खनिज तेलाचे दर वाढले आहेत. तसेच, सोन्याचे भावही वधारले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details