महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजारात ७५० अंशांची तेजी; जीडीपीच्या सकारात्मक अंदाजाचा परिणाम

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७४९.८५ अंशाने वधारून ४९,८४९.८४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २३२.४० अंशाने वधारून १४,७६१.५५ वर स्थिरावला.

Share market update news
शेअर बाजार न्यूज

By

Published : Mar 1, 2021, 5:06 PM IST

मुंबई - सलग दोन सत्रात घसरण अनुभवल्यानंतर शेअर बाजार पुन्हा तेजीत आला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७५० अंशाने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २३२ अंशाने वधारला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ७४९.८५ अंशाने वधारून ४९,८४९.८४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २३२.४० अंशाने वधारून १४,७६१.५५ वर स्थिरावला.

हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

  • शेअर बाजारातील २९ क्षेत्रनिहाय निर्देशांकावरील कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
  • पॉवरग्रीड, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, कोटक बँक आणि टायटनचे शेअर ५.९४ टक्क्यापर्यंत वधारले.

या कारणाने शेअर बाजार निर्देशांक वधारला-

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान जीडीपीची विकासदर हा ०.४ टक्क्यांनी वधारण्याचा अंदाज आहे. बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार देशातील अर्थव्यवस्था पुन्हा सावरत असल्याचे चिन्हे दिसत आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

हेही वाचा-खूषखबर! कोरोनाविरोधातील लस खासगी रुग्णालयात मिळणार फक्त २५० रुपयांत!

शुक्रवारी शेअर बाजारात झाली होती अभूतपूर्व घसरण-

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात १,९३९.३२ अंशाने घसरण झाली होती. ही गतवर्षी ४ मे रोजीनंतर झालेली एका दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण आहे. निफ्टीचा निर्देशांक ५६८.२० अंशाने घसरला होता. ही गतवर्षी २३ मार्चनंतर एका दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण ठरली आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ८,२९५.१७ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.८८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६५.३९ डॉलरवर पोहोचले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details