मुंबई - गेले आठ दिवस मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत आहे. मात्र, आज शेअर बाजार २२२ अंशाने घसरून बंद झाला. फिच या पतमानांकन संस्थेने जीडीपी अंदाजित प्रमाणापेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर शेअर बाजारात नकारात्मक परिणाम दिसून आला.
सकाळच्या सत्रात सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक ३८,४५२ अंशावर पोहोचला. मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्यानंतर निर्देशांकात घसरण झाली. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ३८,१६४ वर पोहोचला. निफ्टीही ६४ अंशाने घसरून ११,४५६ वर पोहोचला. टाटा मोटर्सच्या शेअरची २.४७ टक्के एवढी सर्वात अधिक घसरण झाली. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज (२.४४टक्के), मारुती (१.८४ टक्के), एसबीआय (१.७६ टक्के) आणि बजाज फायनान्सची (१.२३ टक्के) घसरण झाली. एनटीपीसीच्या शेअर सर्वात अधिक ३.३७ टक्के वधारल्याचे दिसून आले.
सलग आठ दिवस वधारलेल्या निर्देशांकाची २२२ अंशाने आपटी
सकाळच्या सत्रात सकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक ३८,४५२ अंशावर पोहोचला. मात्र त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्यानंतर निर्देशांकात घसरण झाली.
प्रतिकात्मक
पतमानांकन संस्था 'फिच'ने वर्तविलेल्या देशाच्या सकल उत्पन्नाच्या अंदाजात बदल केला आहे. आर्थिक वर्ष २०१८ मध्ये देशाचा जीडीपी हा ७ नव्हे तर ६.८ टक्के असेल, असे फिचने म्हटले आहे.