महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मंदीची भीती : सलग तीन दिवस वधारल्यानंतर मुंबई शेअर बाजारात घसरण

बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक ८ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. त्यापाठोपाठ हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक, मारुती आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत. तर अॅक्सिस बँक, आयटीसी, एनटीपीसी आणि एम अँड एमचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Mar 27, 2020, 5:05 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात वधारला होता. बाजार बंद होताना निर्देशांक १३१ अंशांनी घसरला. देशाला अंदाजित विकासदर गाठण्यात अडचणी येणार असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज म्हटले. त्यामुळे मंदी येणार असल्याची गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

महामारी कोरोनाने अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. रेपो दर हा ७५ बेसिस पाँईटने कमी करून ४.४ टक्के केला आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत बँकांचा व्याजदर हा सर्वात कमी राहिला आहे.

हेही वाचा-बँकांच्या शाखांचे कामकाज सुरू, अफवांवर विश्वास ठेवू नये - सरकारचे आवाहन

मुंबई शेअर बाजार १३१.१८ अंशांनी घसरून २९,८१५.५९ वर स्थिरावला आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार ३१,१२६.०३ वर पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक १८.८० अंशांनी वधारून ८,६६०.२५ वर पोहोचला.

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जवसूलीला स्थगिती, आरबीआयच्या निर्णयाने सामान्यांना दिलासा..

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक ८ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. त्यापाठोपाठ हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक, मारुती आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत. तर अॅक्सिस बँक, आयटीसी, एनटीपीसी आणि एम अँड एमचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.

वार्षिक विकासदर घटण्याची शक्यता आणि कोरोनाचा वाढता प्रसार यामुळे शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details