मुंबई- कोरोनाने अर्थव्यवस्था संकटात आल्याने आयटी आणि वित्तीय संस्थांच्या शेअरवर विक्रीचा दबाव दिसून आला. शेअर बाजार ५३५.८६ अंशांनी घसरून ३१,३२७.२२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १५९.५० अंशांनी घसरून ९,१५४.४० वर स्थिरावला.
चलनाच्या तरलतेचा अभाव असल्याने आणि वाढता दबाव या कारणांनी फ्रँकलिन टेम्पलेटन म्युच्युअल फंडने सहा कर्जाच्या योजना बंद केल्या आहेत. या म्युच्युअल फंडमध्ये अनेक किरकोळ गुंतवणूकदार आणि मोठ्या प्रमाणात हिंदू अविभक्त कुटुंबांनी गुंतवणूक केली आहे. योजना बंद झाल्याने अनेक गुंतवणूकदारांना फटका बसणार आहे.
हेही वाचा-अभूतपूर्व : 'फ्रँकलिन टेम्पलेटन'ने सहा म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक योजना केल्या बंद