महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिवसाखेर मुंबई शेअर बाजारात विक्रीचा दबाव; निर्देशांकात ३७९ अंशाने घसरण

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३७९.१४ अंशाने घसरून ५१,३२४.६९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ८९.५५ अंशाने घसरून १५,११८.९५ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Feb 18, 2021, 4:35 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३७९ अंशाने घसरला आहे. एचडीएफसी ट्विन्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. जागतिक आर्थिक मंचावरील नकारात्मक स्थितीने शेअर बाजारात पडझड झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३७९.१४ अंशाने घसरून ५१,३२४.६९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ८९.५५ अंशाने घसरून १५,११८.९५ वर स्थिरावला.

हेही वाचा-इंधन दरवाढीची परभणीला राज्यात सर्वाधिक झळ; नागरिक संतप्त

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

  • बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्यापाठोपाठ कोटक बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, एम अँड एम आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत.
  • ओएनजीसीचे सर्वाधिक सुमारे ८ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. एनटीपीसी, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत

दिवसाखेर शेअर विक्रीचा दबाव-

गुंतवणूकदारांनी खासगी बँका, ऑटो आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर विकून नफा नोंदविल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे. शेअर बाजार खुला होताना निर्देशांक वधारला. मात्र, वधारलेला निर्देशांक टिकू शकला नाही. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने दिवसाखेर शेअर विक्रीचा दबाव दिसून आल्याचे आनंद राठीचे मुख्य संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४८ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६४.६५ डॉलरवर पोहोचले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details