महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक २५० अंशाने वधारला; निफ्टीहून ११,१०० हून खाली - मुंबई शेअर बाजार

जुलैपासून शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण होत आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर सरकार अधिभार कर लावणार असल्याने गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून काढून घेतला होता. हा अधिभार लावण्याचा प्रस्ताव सरकार मागे घेणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजार सावरण्यास सुरुवात झाली आहे.

शेअर बाजार ; Share Market

By

Published : Aug 9, 2019, 12:26 PM IST

मुंबई - केंद्र सरकार विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील कराचा अधिभार कमी करणार असल्याच्या शक्यतेने शेअर बाजारात सकारात्मक चित्र तयार झाले आहे. शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात २५० अंशाने वधारला आहे. बँकिंग आणि उर्जा कंपन्यांचे शेअर वधारले आहे.

शेअर बाजार निर्देशांक गुरुवारी ६३६.८६ अंशाने वधारून ३७,३२७.३६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १७६.९५ अंशाने वधारून ११,०३२.४५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
पॉवरग्रीड, वेदांत, एचडीएफसी ट्विन्स, हिरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एल अँड टी आणि एचसीएल टेक कंपन्यांचे शेअर २ टक्क्यांनी वधारले आहेत. तर टाटा मोटर्स, एम अँड एम, टेक एम, आयटीसी, भारती एअरटेल, येस बँक, इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर १.४१ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.


केंद्र सरकारने विदेशी गुंतवणूकदार संस्थांना अधिभार लावण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात केला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकार मागे घेणार असल्याच्या शक्यतेने गुरुवारपासून शेअर बाजार अधिक प्रमाणात सावरण्यास सुरुवात झाली आहे. जुलैपासून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी निधी काढून घेण्यास सुरुवात केली होती. त्याचा शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ४३७.३९ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी २९१.२९ कोटींच्या शेअरची खरेदी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details