महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक १०० अंशाने वधारला; जागतिक मंचावरील सकारात्मकतेचा परिणाम - share market news

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ७२.२६ अंशाने वधारून ४०,५४२.४० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १७.८० अंशाने वधारून १९,९१३.२५ वर पोहोचला.

संग्रहित - मुंबई शेअर बाजार

By

Published : Nov 18, 2019, 12:40 PM IST

मुंबई- जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १०० अंशाने वधारला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ७२.२६ अंशाने वधारून ४०,५४२.४० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १७.८० अंशाने वधारून १९,९१३.२५ वर पोहोचला.

हेही वाचा-देशाचा जीडीपी दुसऱ्या तिमाहीत घसरून ४.९ टक्के होईल - एनसीएईआरचा अंदाज

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

भारती एअरटेल, एसबीआय, टाटा मोटर्स, सन फार्मा, एल अँड टीचे शेअर हे ३.०९ टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. तर येस बँक, एम अँड एम, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, एचयूएल आणि बजाज ऑटोचे शेअर हे १.४६ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

हेही वाचा-धक्कादायक! केवळ 'या' शहराचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित; सर्व महानगरे निकषात नापास

मुंबई शेअर बाजार ७०.२१ अंशाने वधारून ४०,३५६.६९ वर स्थिरावला होता. निफ्टीचा निर्देशांक २३.३५ अंशाने वधारून ११,८९५.४५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात १००८.३७ कोटींच्या शेअरची शुक्रवारी खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ५३७.७४ कोटींच्या शेअरची विक्री केली.

ABOUT THE AUTHOR

...view details