महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ४१६ अंशांनी वधारला; 'हे' आहे कारण

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ६ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. अॅक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर ५ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Apr 27, 2020, 4:57 PM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंडच्या तरलतेसाठी ५० हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक ४१५.८६ अंशांनी वधारून ३१,७४३.०८ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक खुला होताना निर्देशांक ५५० अंशांनी वधारला होता. निफ्टीचा निर्देशांक आज १२७.९० अंशांनी वधारून ९,२८२.३० अंशांवर पोहोचला.

या कंपन्यांचे वधारले घसरले शेअर

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ६ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. अॅक्सिस बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर ५ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर एनटीपीसी, एम अँड एम, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि आयटीसीचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-म्युच्युअल फंडकरता विशेष ५० हजार कोटी रुपयांची तरलता - आरबीआय

कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर कमी परिणाम होण्यासाठी दक्ष असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. तसेच चलनेतील स्थिरतेसाठी प्रयत्न करत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

हेही वाचा-चीनच्या कोरोना किटमध्येही भारतीय कंपन्यांची नफेखोरी; कारवाईची काँग्रेसची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details