महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक 1128 अंशाने वधारला; गाठला पुन्हा 50,000 चा टप्पा - NIFTY today

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टीने 14,800 अंशाचा टप्पा गाठला आहे. हिंदुस्थान लिव्हर, टायटन, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी आणि एनटीपीसी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

Sensex
शेअर बाजार निर्देशांक

By

Published : Mar 30, 2021, 2:55 PM IST

Updated : Mar 30, 2021, 5:51 PM IST

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1,128 अंशाने वधारला आहे. जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असताना एचडीएफसी ट्विन्स, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 1128.08 अंशाने वधारून 50,136.58 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 337.80 अंशाने वधारून 14,845.10 वर स्थिरावला.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

एचसीएल टेकचे शेअर सर्वाधिक 4 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, इन्फोसिस बँक, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, टीसीएस आणि एचयूएलचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे एम अँड एम, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेचे शेअर घसरले आहेत.

ही आहेत शेअर बाजार निर्देशांक वधारण्याची कारणे-

कोटक सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रस्मीक ओझा म्हणाले की, आजचा दिवस वगळता रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या स्थिर राहिले आहे. अमेरिकेच्या 10 वर्षांच्या कालावधीच्या सरकारी रोख्यांचे व्याज अचानकपणे वाढले आहे. तर भारत सरकारच्या 10 वर्षांच्या कालावधीचे सरकारी रोख्यांचे व्याज हे काहीसे स्थिर राहिले आहे. या दोन कारण शेअर बाजारासाठी अनुकूल ठरले आहेत.

नवीन तिमाही सुरू होताना शेअर बाजार गुंतवणुकदारांनी नव्याने सुरुवात केल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.49 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 64.60 डॉलर आहेत.

अशी होती दुपारी शेअर बाजारातील स्थिती

शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी 1200 अंशाने वधारल्याने बाजाराने पुन्हा 50,000 अंशांचा टप्पा गाठला आहे. धातू, औषधे, वित्तीय आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर वधारले आहे.

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक वधारला आहे. निफ्टीने 14,800 अंशाचा टप्पा गाठला आहे. हिंदुस्थान लिव्हर, टायटन, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी आणि एनटीपीसी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-मुंबईत रिअल इस्टेटला 'अच्छे दिन'; मार्चमध्ये घरांच्या विक्रीत तिप्पटीने वाढ

सकाळी 10 वाजून 25 मिनिटाला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 830.73 अंशाने वधारून निर्देशांक 49,839.23 वर पोहोचला. मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 49,008.50 वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक 255.60 अंशाने वधारून 14,762.90 वर पोहोचला. सकाळच्या सत्रात महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती सुझुकी इंडियाचे शेअर घसरले होते.

हेही वाचा-देशातील ४ कोटी जुन्या वाहनांना द्यावा लागणार हरित कर

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता-

कोरोनाबाधितांची वाढत्या संख्येने शेअर बाजाराची आणखी चिंता वाढू शकते. इक्विटी रिसर्चचे प्रमुख निराली शाह म्हणाल्या की, या आठवड्यात महत्त्वाचे कार्यक्रम नाहीत. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना बाजार पुन्हा अस्थिर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वाहन कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणुकदारांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. कारण, वाहन विक्रीची आकडेवारी गुरुवारी जाहीर होणार आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर, रुपयाचे मूल्य आणि विदेशी गुंतवणूकदार संस्था यांच्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, सोमवारी होळीनिमित्त शेअर बाजारातील व्यवहार बंद होते.

Last Updated : Mar 30, 2021, 5:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details