महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाची घसरण; ऊर्जा कंपन्यांचे सावरले शेअर - trade war impact on share

मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८६.९४ अंशाने वधारून ३६,६६८.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४३.१५ अंशाने वधारून १०,८६०.७५ वर पोहोचला.

संग्रहित - शेअर बाजार

By

Published : Sep 18, 2019, 12:18 PM IST

मुंबई - जागतिक कच्च्या तेलाचे दर वाढल्याने मंगळवारी कोसळलेला शेअर बाजार आज सावरत आहे. ऊर्जा कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. त्याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २०० अंशाने वधारला आहे.


मुंबई शेअर बाजार निर्देशांक १८६.९४ अंशाने वधारून ३६,६६८.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४३.१५ अंशाने वधारून १०,८६०.७५ वर पोहोचला. मंगळवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६४२.२२ अंशाने घसरून ३६,४८१.०९ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा १८५.९० अंशाने घसरून १०,८१७.६० वर पोहोचला होता.

हेही वाचा-प्लास्टिकच्या कचऱ्यातून मिळणार पैसे, या राज्याने आणली अभिनव योजना


या कंपन्यांचे शेअर घसरले- वधारले
बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, येस बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, टाटा स्टील, वेदांतचे शेअर २.१० टक्क्यापर्यंत वधारले आहे. याचबरोबर एशियन पेंट्स, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि टीसीएसचे शेअर हे २.१० टक्क्यापर्यंत वधारले आहेत. मारुती, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एचयूएल, ओएनजीसी आणि आयटीसीचे शेअर हे १.५० टक्क्यापर्यंत घसरले आहेत.

हेही वाचा-कच्च्या तेलाच्या वाढत्या दराने शेअर निर्देशांकात ६४२ अंशाची पडझड

अशी आहे जागतिक आर्थिक परिस्थिती-

अमेरिका-चीनमध्ये व्यापारी करार हा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर होवू शकेल, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात कपात होईल, ही चिंता जगभरातील गुंतवणुकदारांना भेडसावत आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगात मंदी सुरू असताना हिरो मोटोकॉर्पकडून कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना

ABOUT THE AUTHOR

...view details