मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजारातील तेजी कायम आहे. निर्देशांकात सकाळच्या सत्रात १७० अंशाची वाढ होवून निर्देशांक ३९,२२३ वर पोहोचला. तर रुपयाही डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी मजबूत होवून ६९.७८ वर आला आहे.
मागील सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार अंशाची वाढ होवून निर्देशांकाने ४०,००० चा टप्पा गाठला होता. मात्र नफा वसुली करणाऱ्या गुंतवणुकदाराच्या प्रयत्नामुळे हा निर्देशांकाचा टप्पा स्थिर राहू शकला नव्हता.
निफ्टीच्या निर्देशांकातही आज ५४.१५ अंशाची वाढ होवून ११,७११.२० वर पोहोचला.
या कंपन्यांच्या शेअरचे दर वधारले-घसरले-
एल अँड टी, भारती एअरटेल, सेबी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, एम अँड एम, आयसीआयसी बँक, अॅक्सिस बँक, इंडुसलँड बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी ट्विन्सचे शेअर २ टक्क्यापर्यंत वाढले. तर बजाज ऑटो, ओएनजीसी, एचयूएल, कोल इंडिया, एचसीएल टेक, टीसीएस, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २ टक्क्याने घसरले.
स्थिर सरकारची बाजाराला अपेक्षा-
एनडीए सरकारच्या अपूर्ण धोरणाची पूर्तता करण्यासाठी तेच सरकार सत्तेत येणे महत्त्वाचे असल्याचे ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक कृष्णा कारवा यांनी म्हटले आहे.
जागतिक गुंतवणुकदार आणि तसेच भारतामधील कॉर्पोरेट क्षेत्रालाही स्थिर आणि मजबुत सरकारची अपेक्षा आहे. विदेशी गुंतवणुकीची आणि थेट विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) प्रमाण स्थिर राहिल अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
विदेशी गुंतवणुकदारांनी १ हजार ३५२.२० शेअरची गुरुवारी खरेदी केली. तर देशातील गुंतवणुकदार संस्थांनी ५९३.५४ कोटींच्या शेअरची विक्री केल्याचे शेअर बाजारातील आकेडवारीतून दिसून आले आहे.
गुरुवारी शेअर बाजार बंद होताना निर्देशांक हा २९८.८२ अंशाने घसरून ३८,८११.३९ वर पोहोचला होता. तर निफ्टीत ८०.८५ अंशाची घसरण होवून ११,६७.०५ वर निर्देशांक पोहोचला होता.