मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात ३०० अंशाची वाढ झाली. हा निर्देशांक ३८, १३२ अंशावर पोहोचला. निफ्टीनेही ११ हजार ५०० अंशाचा आकडा ओलांडला.
शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशाच्या वाढीने पोहोचला ३८,१३२ अंशावर - Pharma
विदेशी वित्तसंस्थांची गुंतवणुकीचा ओघ सुरू राहिल्याने वित्तीय आणि बँकाचे शेअर वधारले. ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअरमध्ये मात्र घसरण झालेली आहे. शुक्रवारी निर्देशांक हा ३८,०२४ अंशावर बंद झाला होता. निफ्टीचा निर्देशांक हा ११,४७३ अंशावर खुला झाला.
विदेशी वित्तसंस्थांची गुंतवणुकीचा ओघ सुरू राहिल्याने वित्तीय आणि बँकाचे शेअर वधारले. ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअरमध्ये मात्र घसरण झालेली आहे. शुक्रवारी निर्देशांक हा ३८,०२४ अंशावर बंद झाला होता. निफ्टीचा निर्देशांक हा ११,४७३ अंशावर खुला झाला. शुक्रवारी निफ्टीचा निर्देशांक हा ११,४२६ अंशावर बंद झाला होता. सकाळच्या सत्रात निफ्टीचा निर्देशांक हा ९५ अंशाने वाढून ११,५२२ वर पोहोचला.
विदेशी गुतंवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ४ हजार ३२३.४९ कोटी शेअरची खरेदी केली. तर देशातील वित्तीय गुंतवणूकदारांनी २ हजार १३०.३६ कोटी शेअरची विक्री केली होती.