मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ३७३.१४ अंशाने घसरून ३७,९६३.८७ वर पोहोचला. विदेशी गुंतवणुकदारांनी निधी काढून घेतल्याने हा परिणाम झाला आहे.
निफ्टीचा निर्देशांक ११६.८० अंशाने घसरून ११,३०२.४५ वर पोहोचला. मागील सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक ५६०.४५ अंशाने घसरून ३८,३३७.०१ वर पोहोचला होता. निफ्टीच्या निर्देशांकात १७७.६५ अंशाची घसरण होवून ११,४१९.२५ वर पोहोचला. चालू वर्षात दुसऱ्यांदा शेअर बाजारात एवढी मोठी घसरण झाली आहे. यापूर्वी ८ जूलैला शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७९२.८२ अंशाची घसरण झाली होती.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
एचडीएफसीच्या बुडित कर्जाच्या (एनपीए) प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले. त्यामुळे एचडीएफसीच्या शेअरची सर्वात अधिक म्हणजे ३ टक्क्यापर्यंत घसरण झाली.
बजाज फायनान्स, इंडुसइंड बँक, कोटक बँक, ओएनजीसी, एचयूएल, आयटीसी, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि आयसीआयसी बँकेचे शेअर हे २.८५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. वेदांत, टाटा मोटर्स, येस बँक, सन फार्म, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स आणि मारुतीचे शेअर हे३.५४ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ९५०.१५ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ७३३.९२ कोटींच्या शेअरची खरेदी केली. सरकारने विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी निधी काढून घेतल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
देशातील गुंतवणूकदार हे मंदावलेली अर्थव्यवस्था, असमाधानकारक मान्सून अशा समस्यांनी चिंतित आहेत.