मुंबई- शेअर बाजार गुंतणूकदारांनी सुमारे २ लाख २४ हजार ९७८.३३ कोटी रुपये गमाविले आहेत. सलग तीन सत्रानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला होता. मुंबई-शेअर बाजार निर्देशांक ६९४.९२ अंशाने घसरून ४३,८२८.१० वर स्थिरावला. त्यापूर्वी शेअर बाजाराने ४४,८२५.३७ निर्देशांक गाठून आजपर्यंतचा निर्देशांक गाठला.
निफ्टीचा निर्देशांक १९६.७५ अंशाने घसरून स्थिरावला. निफ्टीही १३,१४५.८५ निर्देशांक गाठून आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक गाठला.
बँकांच्या शेअरमध्ये घसरण-
कोटक बँकेचे सर्वाधिक ३ टक्क्यांनी शेअर घसरले. त्या पाठोपाठ अॅक्सिस बँक, सन फार्मा, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचे शेअर घसरले. ओएनजीसी, पॉवरग्रीड आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले.
हेही वाचा-गुगलचा जिओमध्ये ७.७३ टक्के हिस्सा; रिलायन्सला मिळाले ३३,७३७ कोटी रुपये!
शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता-
भविष्यातील शेअरची (डेरिटिव्हज) सौद्याची मुदत संपत असताना शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख विनोद मोदी म्हणाले. गेल्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली होती. त्यामुळे गुंतवणूकादार नफा गुंतविणार असल्याची अपेक्षा होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.१५ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४८.३३ डॉलर आहेत.
हेही वाचा-या ४३ अॅपवर केंद्राकडून बंदी, देशाच्या सुरक्षेला होता धोका
गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा-
शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे २ लाख २४ हजार ९७८.३३ कोटी रुपये गमावले आहेत. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगाडिया म्हणाले, की गेल्या काही सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. मात्र, शेअर बाजारात आज सर्वोच्च निर्देशांकाची नोंद होऊन आज घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सकारात्मक स्थिती असूनही गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफा नोंदविला आहे.