महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार ७८८ अंशाने कोसळला; अमेरिका-इराणमधील तणावाचा परिणाम

कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी सर्वात अधिक भारतावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रसमिक ओझा यांनी सांगितले.

Mumbai Share Market
शेअर बाजार

By

Published : Jan 6, 2020, 5:13 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ७८८ अंशाने कोसळला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २३४ अंशाने घसरला आहे. खनिज तेलाचे उत्पादन घेणारे दोन आघाडीचे देश असलेल्या इराण व अमेरिकेत तणावाची स्थिती आहे. त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारासह भारतीय भांडवली बाजारावर उमटले आहेत.


मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७८७.९८ अंशाने घसरून ४०,६७५.६३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २३३.६० अंशाने घसरून ११,९९३.०५ वर स्थिरावला.

हेही वाचा-नाशिक : तीनच दिवसात सोने ३,२०० रुपयांनी महाग


या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
बजाज फायनान्सचे शेअर सर्वाधिक ४.६३ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ एसबीआय, इंडुसइंड बँक, मारुती, एचडीएफसी, हिरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले. तर टायटन आणि पॉवरग्रीडचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-बीएस-६ इंजिनक्षमतेच्या इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरू; 'ही' आहेत फीचर्स

कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी सर्वात अधिक भारतावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रसमिक ओझा यांनी सांगितले. कच्च्या तेलाचा चलनासह भारतीय बाजारपेठेवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत २ डॉलरने वाढून ६९.८१ डॉलर झाली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरण होवून ७२.०४ डॉलरवर पोहोचला.

ABOUT THE AUTHOR

...view details