मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगावरील लोकप्रतिनिधी सभागृहात मंजुरी मिळाली आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक २४.८९ अंशाने घसरून ४१,५३३.६८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ७.६० अंशाने घसरून १२,२१४.३० वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
येस बँकेचे शेअर सर्वाधिक २.४६ टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर इंडुसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचडीएफसी, टाटा स्टील आणि भारती एअरटेलचे शेअर घसरले. एम अँड एमचे शेअर सर्वाधिक १.२६ टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेक, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टीसीएस आणि एचयूएलचे शेअरही वधारले.
हेही वाचा-टाटा सन्सच्या चेअरमन पदावर नियुक्ती देणाऱ्या निकालावर सायरस मिस्त्री म्हणाले...