मुंबई -अमेरिकेच्या अध्यक्षांचा शपथविधी पार पडणार असताना जगभरातील बाजारपेठेत सकारात्मक चित्र आहे. अशा स्थितीतशेअर बाजाराने दिवसाखेअर निर्देशांकाचा नवा उच्चांक गाठला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १२३.५५ अंशाने वधारून १४,६४४.७० वर स्थिरावला. हा आजपर्यंतचा सर्वाधिक निर्देशांक राहिला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३९३.८३ अंशाने वधारून ४९,७९२.१२ वर स्थिरावला. हा मुंबई शेअर बाजाराचा आजपर्यंतचा सर्वाधिक निर्देशांक राहिला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी पदी नियुक्ती होणाऱ्या जेनेट येले यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या पॅकेजची मागणी केली आहे. निवडणुकीत विजय मिळविलेले जो बिडेन हे आज अध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी १.९ लाख कोटी डॉलरचे पॅकेज प्रस्तावित केले आहे.
हेही वाचा-जॅक मा अखेर व्हिडिओमधून आले समोर; दोन महिने होते बेपत्ता