मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सलग सहाव्या सत्रात वधारला आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेअर १९.६९ अंशाने वधारून ५१,३२९.०८ वर स्थिरावला. त्यापूर्वी शेअर बाजाराचा निर्देशांक ४८७ अंशाने वधारून ५१,८३५.८६ वर पोहोचला.
निफ्टीचा निर्देशांक ६.५० अंशाने घसरून १५,१०९.३० वर स्थिरावला. त्यापूर्वी निफ्टीचा निर्देशांक १५,२५७.१० वर स्थिरावला.
हेही वाचा-इंधनात दरवाढीचा पुन्हा भडका; दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपयांहून अधिक
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
एम अँड एमचे शेअर सर्वाधिक सुमारे ४ टक्क्यापर्यंत घसरले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, आयटीसी, सन फार्मा, बजाज ऑटो, बजाज फिनसर्व्ह आणि टीसीएसचे शेअर घसरले. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, ओएनजीसी, टायटन, एल अँड टी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-सुरक्षेची खराब मानांकने असलेली वाहने विकू नयेत; केंद्राची कंपन्यांना सूचना
शेअरची खरेदी आज मोठ्या प्रमाणात झाली असली तरी दिवसाखेर गुंतवणुकदारांनी शेअर विक्री करून नफा नोंदविला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर झाल्यापासून शेअर बाजार निर्देशांकाने नवनवीन उच्चांक गाठले आहेत.
अशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती-
आशियामधील शांघाय, हाँगकाँग आणि टोकियामधील शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. तर दक्षिण कोरियामधील सेऊल शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४० टक्क्यांनी वधारून ६०.९४ प्रति बॅरल आहेत.