मुंबई - शेअर बाजार आणि निफ्टीच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 243.62 अंशाने घसरून 47,705 वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 243.62 अंशाने घसरून 47,705. वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 63.05 अंशाने घसरून 14,296.40 वर स्थिरावला.
हेही वाचा-निर्बंध लावल्याने किती फायदा होतो याचा सरकारने विचार करावा - फडणवीस
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि एचयूएल या कंपन्यांचे सर्वाधिक 4.7 टक्क्यांपर्यंत शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डीज, बजाज फायनान्स, बजाज ऑटो आणि मारुतीचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.
हेही वाचा-भारत बायोटेककडून लसनिर्मिती क्षमतेत 20 कोटींनी वाढ
गुंतवणुकदारांची वाढली चिंता-
बाजार विश्लेषकांच्या मते देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. काही राज्यांनी संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी टाळेबंदीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.77 टक्क्यांनी वाढून 67.68 डॉलर आहे. भारतासह जगभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना कच्च्या तेलाची मागणी होत आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत.