महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ४८३ अंशांनी वधारून बंद; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर - Sensex

कोरोनाचे संकट असल्याने आर्थिक दिलासा देणाऱ्या दुसऱ्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा होईल, अशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना शक्यता वाटत आहे. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचे बाजार विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Apr 23, 2020, 4:44 PM IST

मुंबई - शेअर बाजार ४८३.५३ अंशांनी वधारून ३१,८६३.०८ वर स्थिरावला आहे. आयटी आणि बँकिंग क्षेत्रांना आणखी पॅकेज मिळण्याच्या शक्यतेने शेअर बाजार गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २५० अंशांनी वधारला होता. निफ्टीचा निर्देशांक १२६.५० अंशांनी वधारून ९,३१३.९० वर स्थिरावला. कोटक बँकेचे सर्वाधिक ८ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि ओएनजीसीचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-कोरोनाचा अर्थव्यवस्थेला 'संसर्ग'; चालू आर्थिक वर्षात ०.८ टक्के विकासदर!

टायटन, एचयूएल, पॉवरग्रीड, एनटीपीसी आणि नेस्ले इंडियाचे शेअर घसरले आहेत. कोरोनाचे संकट असल्याने आर्थिक दिलासा देणाऱ्या दुसऱ्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा होईल, अशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना शक्यता वाटत आहे. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचे बाजार विश्लेषक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले. डॉलरच्या तुलनेत ६२ पैशांनी वधारून रुपया ७६.०६ डॉलरवर पोहोचला आहे.

हेही वाचा-केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसह पेन्शरांना मिळणार नाही वाढीव महागाई भत्ता

ABOUT THE AUTHOR

...view details