मुंबई -शेअर बाजार निर्देशांकात १५०.७९ अंशाने वधारून ३८,२३२.८७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ३४ अंशाने वधारून ११,३४० वर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांची भांडवली बाजारात वाढलेली गुंतवणूक आणि जागतिक आर्थिक मंचावरील अनुकल स्थितीमुळे शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
शेअर बाजार निर्देशांक १५० अंशाने वधारला; जागतिक अनुकूल स्थितीचा परिणाम - Bombay share market news
टाटा मोटर्स, वेदांत, टाटा स्टील, सन फार्म, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एचयूएल आणि एसबीआयचे शेअर ४ टक्क्यापर्यंत वधारले. इन्फोसिस, पॉवरग्रीड, टेकएम, कोटक बँक आणि टीसीएसचे शेअर ३ टक्क्यापर्यंत घसरले.
टाटा मोटर्स, वेदांत, टाटा स्टील, सन फार्म, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, एचयूएल आणि एसबीआयचे शेअर ४ टक्क्यापर्यंत वधारले. इन्फोसिस, पॉवरग्रीड, टेकएम, कोटक बँक आणि टीसीएसचे शेअर ३ टक्क्यापर्यंत घसरले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी ७४९.७४ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवूकदार संस्थांनी ७०३.०२ कोटींच्या शेअरची विक्री केली होती.
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर घसरल्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. चालू वर्षात विकासदर हा ६ टक्के राहिल, असा जागतिक बँकेने अंदाज वर्तविला आहे.